‘इन्शाअल्लाह’ : धर्मांच्या ध्रुवीकरणाला विरोध करत ‘सच्ची इन्सानियत’, ‘सच्चा मजहब’ आपल्यापुढे मांडणारी कादंबरी
या कादंबरीतील रफिकजी, झुल्फी यांची समाजात, व्यक्तींच्या विचारात परिवर्तन घडवून आणण्यासाठी चाललेली धडपड वाचताना केवळ कथानक वा एखादी घटना वाचत नसून आपण आपल्याच विचारांशी संघर्ष करू लागतो, स्वतःला तपासून पाहू लागतो. कारण आपल्या अंतर्मनाला ढवळून काढत समाजातील वास्तवाचं दाहक चित्रण भडकमकर यांनी अत्यंत संयमानं केलं आहे. संवेदनशील विषयावर व्यक्त होताना कादंबरीकारानं तटस्थ राहून कादंबरीचा पट मांडला आहे.......